सातारा : युवतीला शिवीगाळ प्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील गोलबाग मारुती मंदिरासमोर युवतीला शिवीगाळ केल्याप्रकरणी जुबेर शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शाहू कलामंदिर शेजारी, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 20 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास घडला. पोलीस अधिकारी जगदाळे तपास करत आहेत.