नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज असून ते आता जारी करण्यात आलं आहे. महिला सुरक्षारक्षक स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर घेऊन येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी स्वाती महिला सुरक्षारक्षकाचा हात झटकताना दिसत आहेत.
13 मे रोजीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून पीसीआर कॉल करण्यात आला होता. स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.
याआधी शुक्रवारी (17 मे) आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता जो 13 मेचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील आहे. विभव कुमार बाजूला उभा होता आणि सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांच्याशी बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच दरम्यान स्वाती मालीवाल 'मी सर्वांना धडा शिकवेन' असं म्हणताना दिसत आहेत.
विभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्वाती मालीवाल यांनी 13 मे रोजी सुरक्षेचा भंग करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर स्वाती ड्रॉईंग रूममध्ये आल्या आणि त्यांनी गोंधळ घातला. विभव कुमार यांच्यावरील आरोप खोटे असून त्यांनी स्वाती मालीवाल यांना मारहाण केली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस |
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद |
ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) ची स्थापना |
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |