सातारा व जावलीतील विकासकामांसाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

by Team Satara Today | published on : 29 March 2026


सातारा : तालुक्यातील आकले येथील गोसावी वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 8 लाख रुपये, कळंबे येथे रामोशी वस्ती येथे बंदिस्त गटर करणे 5 लाख व रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 5 लाख रुपये, शेंद्रे येथे गोसावी वस्तीतील रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, वर्ये येथे आझादनगर भांडी वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लाख, आंबवडे बु. लोहारवस्ती येथे बंदिस्त गटर व रस्ता करणेसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

जावली तालुक्यातील बोंडारवाडी येथील धनगरवस्ती येथे मेन रोड ते जननी देवी मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लाख, जवळवाडी येथील गोपाळवस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लाख, म्हाते खु. येथील म्हातेपुरा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लाख, कारगाव येथील मानेवस्ती येथे मंदिर ते रामचंद्र माने घर रस्ता काँक्रीटीकरण करणे 7 लाख, खर्शी त. कुडाळ येथील गोसावी वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर करणे 10 लाख आणि गाळदेव येथील भवानी नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला हादरा; ३ माजी आमदारांसह ६ बडे नेते काँग्रेसमध्ये; पक्षांतरामुळे राजकीय वातावरण तापले
पुढील बातमी
धरणे होऊ लागली रिकामी; प्रमुख सहा प्रकल्पांत ८४ टीएमसीवर तर कोयनेत ६१ टीएमसी पाणी

संबंधित बातम्या