सातारा शहरातील नवीन एमआयडीसी परिसरात मोटारसायकलच्या धडकेत एक पादचारी गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा : शहरातील नवीन एमआयडीसी परिसरात मोटारसायकलच्या धडकेत एक पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मंदा शंकर जाधव (वय ६२. रा. देगाव, सातारा) या सातारा येथील आपले भाजीचे दुकान बंद करून सातारा–देगाव रोडने सुटकेस चौक, नवीन एमआयडीसी परिसरात पायी जात असताना, जिजाऊ पान शॉपजवळ अचानक पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात जाधव या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला तसेच उजव्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमली. उपस्थितांपैकी एका व्यक्तीने जखमींच्या मुलाला, रविंद्र शंकर जाधव याला फोनद्वारे माहिती दिली. तो तातडीने घटनास्थळी पोहोचला व स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना नंतर मंगलमूर्ती हॉस्पिटल, सातारा येथे हलवण्यात आले.

दरम्यान, अपघात घडवून आणणाऱ्या मोटारसायकल चालक रोहित महेश यादव याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात जमिनीच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण; एक जखमी
पुढील बातमी
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मोळाचा ओढा येथील एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या