सातारा : कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांचे कार्यक्षेत्रातील कोयना / तारळी / उत्तरमांड/ वांग/उत्तरवांग नद्या तसेच सदर नद्यावरील को.प. बंधारे व महिंद/ चाफळ व चाळकेवाडी ल.पा. तलाव इत्यादी ठिकाणी अतिवृष्टीमुळे उदभवणाऱ्या पूरामुळे शेतकऱ्याच्या पंपाचे नूकसान होण्याची शक्यता आहे.
सन २०२५ चा पावसाळा हंगाम सुरु होणेपूर्वी कोयना / तारळी / उत्तरमांड/वांग/उत्तरवांग नद्या तसेच सदर नद्यावरील को.प. बंधारे व महिंद/ चाफळ/ चाळकेवाडी ल.पा. तलावावरील असणाऱ्या उपसा सिंचन योजनेचे पंप शेतकऱ्यानी त्यांचे स्वखर्चाने सुरक्षित स्थळी तात्पूरत्या स्वरुपात हलविणेत यावेत. अन्यथा सन २०२५ चे पावसाळ्यात शेतकऱ्याच्या पंपाचे पूरामुळे नूकसान झालेस त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबधित शेतकऱ्याची असेल त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. याची नोंद घेऊन शासनास सहकार्य करावे हि विनंती.