भूपेंद्र यादव यांनी घेतले प्रतापगडच्या तुळजाभवानीचे दर्शन

by Team Satara Today | published on : 11 October 2024


सातारा : केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी येथील प्रतापगड किल्ल्यावरील तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले हे सपत्नीक हजर होते. उदयनराजे यांच्यासमवेत यादव यांनी किल्ले प्रतापगडची पाहणी केली.

किल्ले प्रतापगड येथे दुर्गाष्टमी निमित्त आयोजित सोहळ्यात भूपेंद्र यादव यांनी सहभाग घेत देवीचे दर्शन घेत महाआरती सोहळ्यात सहभाग नोंदविला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी यादव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

महाआरती सोहळ्यानंतर भूपेंद्र यादव यांनी प्रतापगडाची पाहणी केली. तसेच तेथे सुरू होणार्‍या विकासकामांची त्यांनी खासदार उदयनराजे यांच्याकडून माहिती घेतली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार : मुख्यमंत्री शिंदे
पुढील बातमी
सावित्रीच्या लेकींकडून समाजप्रबोधनात्मक महाभोंडला

संबंधित बातम्या