किन्हई येथे घरफोडी सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरीला

by Team Satara Today | published on : 02 May 2025


सातारा :  किन्हई तालुका कोरेगाव येथे राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने एक लाख 26 हजार चा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मीना दादासो फडतरे वय 55 यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार फिर्यादी काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आज प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातून रोख रक्कम फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे पन्नास हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 76 हजार रुपये असा 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फडतरे या माघारी घरी परतल्या असता, त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले, त्यांनी बुधवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रतापसिंह नगर येथे एकाला कोयत्याने मारहाण
पुढील बातमी
खंडाळा तालुक्यात अल्पवयीन युवतीचा विनयभंग

संबंधित बातम्या