सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी केसरकर पेठ, सातारा येथे अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सोहेल गफूर सय्यद रा. सदर बाजार सातारा याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत, कोयना सोसायटी येथे अश्रफ असलम शेख रा. सदर बाजार, सातारा याच्यावरही अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.