कैलास स्मशानभूमीच्या सेवकांना बोनस वाटप; 1 पगार आणि दिवाळी साहित्याचे किट बोनस

by Team Satara Today | published on : 17 October 2025


सातारा :  दिवाळीच्या निमित्ताने कैलास स्मशानभूमीच्या सेवक वर्गाला 1 पगार आणि दिवाळी साहित्याचे किट बोनस म्हणून दरवर्षी प्रमाणे वाटप करण्यात आले.

जे कर्मचारी रात्रंदिवस कैलास स्मशानभूमीची देखभाल करतात, स्वच्छता ठेवतात, त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहावी दिवाळी त्यांच्या कुटुंबासह आनंदात साजरी करता यावी म्हणून कर्तव्य भावनेतून श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कायमच या सेवकांच्या पाठीशी उभे असते.

या कर्मचाऱ्याचे आर्थिक, आणि आरोग्य दृष्ट्या भविष्य उज्वल व्हावे म्हणून त्यांच्या साठी ई.एस.आय., एस.आय.पी., खाती सुरू केले आहेत. तसेच दरमहा धान्य, युनिफॉर्म देऊन त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य सुध्दा दिले जाते.

यावेळी श्री बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, संजय कदम, जगदीश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, नितीन माने, दीपक मेथा, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे, जयदीप शिंदे, अर्जुन चोरगे, पीयुष खंडेलवाल, श्रावण पाटील, संजय केंदे आणि 8 सेवक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळ्यात ट्रकची तीन वाहनांना धडक; तीन जण जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली
पुढील बातमी
आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार; पालकमंत्री शंभूराज देसाई, सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

संबंधित बातम्या