सातारा : सातारा शहर परिसरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये एक अल्पवयीन मुलगी, महिला, वृद्ध व युवक बेपत्ता झाल्याच्या नोंदी शाहूपुरी व शहर पोलीस ठाण्यांमध्ये झाल्या आहेत.
शहरातील अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने सोमवारी (दि. 3) अपहरण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल तपास करत आहेत. दुसर्या घटनेत, हॉटेलमध्ये कामाला जातो, असे सांगून, घरातून गेलेला युवक बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार भोसले तपास करत आहेत. शहरातील एक वृद्ध बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. महिला पोलीस हवालदार पाटील तपास करत आहेत. शहरातील एक महिला घरातून कोणाला काही न सांगता निघून गेल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. महिला हवालदार पाटील तपास करत आहेत.