सातारा: माण ही बुद्धीची खाण असे म्हणत पांगरी, ता. माण अजय दडस यांनी गोवा येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यश मिळवले. या स्पर्धेत ३३ देशातील सुमारे १३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
गोवा येथे पार पडलेल्या स्पर्धेत पांगरी, ता. माण येथील अजय दडस या युवकाने १.९ किमी समुद्रात पोहणे, ९० किमी सायकलींग, २१.१ किमी धावणे या स्पर्धेत आपली कार्यक्षमता सिद्ध करत पहिल्याच प्रयत्नात आयर्नमॅन हा किताब पटकावला. अजय दडस हे सध्या गुजरात मधील बडोदा विमानतळ येथे असिस्टंट या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नोकरी सांभाळत फिटनेससाठी वेळ काढत ही स्पर्धा पूर्ण केली आहे. भारतीय विमानपतन प्राधिकरणामधील देशातील पहिलाच खेळाडू होण्याचा बहुमान देखील त्यांना प्राप्त झाला आहे.