नियोजित दौरा शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी सुरू होणार आहे. स. 10.30 वा. मेढा (विश्रामगृह, मेढा), दु. 12.30 वा. महाबळेश्वर (विश्रामगृह,महाबळेश्वर), दु. 3.00 वा. - खंडाळा (विश्रामगृह, खंडाळा), सायं 5.00 वा. - लोणंद (विश्रामगृह, लोणंद), रात्री फलटण राखीव व मुक्काम
शनिवार दि. 22 फेब्रुवारी रोजी स. 10.00 वा. - फलटण (फलटण, विश्रामगृह), दु. 1.00 वा. - दहिवडी (दहिवडी, विश्रामगृह), सायं. 4.00 वा. - म्हसवड (म्हसवड, विश्रामगृह), सायं. 6.00 वा. - वडूज (वडूज, विश्रामगृह), रात्री वडूज राखीव व मुक्काम
रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी स. 10.00 वा. - औंध (विश्रामगृह, औंध ), दु. 12.00 वा. - मसूर, दु. 3.00 वा. - कराड (कराड,विश्रामगृह), सायं. 5.00 वा. - ढेबेवाडी, सायं. 7.00 वा. - पाटण (विश्रामगृह, पाटण) यानंतर या दौऱ्याची सांगता होणार आहे.
सोमवार दि. 24 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा सातारा येथे संपन्न होणार आहे.
या दौऱ्यात एकनाथ ओंबळे (सहसंपर्क प्रमुख, सातारा जिल्हा), वासुदेव माने (मा.नगराध्यक्ष रहिमतपूर, जेष्ठ शिवसैनिक, निलेश निकम (जिल्हाप्रमुख, सैनिक आघाडी), शारदाताई जाधव (जिल्हाप्रमुख महिला आघाडी,सातारा), मा.सुलोचनाताई पवार (उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, सातारा), निलेश मोरे (शहरप्रमुख, सातारा), विजयराव पाटील (कार्यालयप्रमुख, सातारा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी या दौऱ्यात सर्व उपजिल्हाप्रमुख, विधानसभासंघटक, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, शहरसंघटक, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख पुरुष/महिला, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सर्व शासकीय कमिटी सदस्य व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.