10:45pm | Dec 06, 2023 |
सातारा : पुणे जिल्हयातील काही शेतकरी हे बेळगाव येथे कांदयाची विक्री करून टेम्पोमधून प्रवास करीत गावी परतत असताना दि. 3 रोजी पहाटेच्या सुमारास वाढे ता.जि. सातारा येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी काहीजण चहा पिण्यासाठी गाडीतून उतरले होते, तर काही गाडीमध्ये झोपलेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने या टेम्पोमधून पैसे ठेवलेली बॅँग चोरी करून तेथून पसार झाले होते. चोरी झालेल्या बँगेमध्ये एकूण 18 लाख 60 हजार रुपये होते.
चोरी झाल्याची माहीती संबंधित शेतकरी यांना प्रवासादरम्यान समजल्याने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात येवून चोरी झाल्याबाबतची माहिती दिली. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उप.वि.पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनेची सविस्तर माहिती प्राप्त करून टेम्पो चालकास प्रथम चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलीसांनी विचारलेल्या प्रश्नांना विसंगत अशी उत्तरे दिल्याने त्याच्यावरील संशय अधिक बळावला गेला होता. त्याच्याकडे अधिक कौश्यलपूर्वक विचारपूस केल्यानंतर त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांना वाढे फाटा येथे बोलावून घेवून त्यांच्याकडे सदरची बँग चोरी करून दिली असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच इतर दोन युवकांची माहिती प्राप्त करून त्यांच्या शोधकामी एक पथक दौड तालुक्यात जावून त्यांनी ठिकठिकाणी छापे टाकून गुन्हयातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकड़े तपासादरम्यान चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेल्या रक्कमेपैकी 17 लाख 99 हजार 40 रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे.
गुन्हा घडताच पोलीसांनी चोरी करणारे गणेश ताकवणे वय २८ रा पारगाव ता. दौंड, अजय भारत भोले वय २५ रा पारगाव ता. दौंड, अन्सार उस्मान शेख वय २१ रा नाणगांव ता. दौंड या तीन संशयित आरोपींना तात्काळ ताब्यात घेवून चोरी झालेली रक्कम हस्तगत केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सातारा पोलीस दलाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे.
ही कारवाई महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. सुजित भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते पो.कॉ. संतोष घाडगे, रोहीत पवार, मच्छिद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी केलेली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |