सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी ज्ञानेश्वर बजरंग शिंदे रा. माची पेठ, सातारा हा घरातून निघून गेला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 1 रोजी दुपारी चार वाजल्याच्या दरम्यान शिवाजी बापू चव्हाण राहणार अजूनज, ता. खंडाळा, जि. सातारा हे 71 वर्षीय वृद्ध सातारा एसटी स्टँड परिसरातून कुठेतरी निघून गेले आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.