सातारा : खावली, ता. सातारा येथे जुन्या भांडणाच्या कारणातून मारहाण केल्याचा प्रकार दि. 9 रोजी घडला.
याप्रकरणी अनमोल सुनील निकम (वय 24, रा. जांब, त्रिपुटी, ता. कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गणेश काटकर (रा. त्रिपुटी), निखिल बर्गे (रा. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल पवार तपास करत आहेत.