साताऱ्यात सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन

by Team Satara Today | published on : 08 April 2025


सातारा : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे औचित्य साधून साहाय्यक आयुक्त समाजकल्याण सातारा यांच्या वतीने नगरपालिका समोरील डॉ. बाबासाहेब आंबेकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समता सप्ताहाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. 

या प्रसंगी सातारा जिल्हा साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण मा. सुनील जाधव यांनी सामाजिक समता सप्ताहाचे प्रारूप उपस्थितांसमोर सविस्तरपणे मांडले. यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनाचा प्रचार व प्रसार करणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे सामाजिक जीवन कार्याचे विचार जनसामान्या पर्यंत पोहचविणे, भारतीय संविधानाचा जागर करणे,विविध स्पर्धाचे आयोजन करणे, स्वच्छता अभियान राबविणे, रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, विविध क्षेत्र भेटी देऊन लाभार्थ्याशी संवाद साधणे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार  असल्याची माहिती दिली. प्रसंगी उपस्थित अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी विदयानंद चल्लावर बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे कार्यालय अधिक्षक मुकुंद गोरे आधी अधिकारी कर्मचारी, जात पडताळणी अधिकारी, सर्व आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी, समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थी व जिल्ह्यातील समतादूत उपस्थित होते.

समतादूत विशाल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल गंगावणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आरोळी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सार्वजनिक आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा
पुढील बातमी
देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग

संबंधित बातम्या