सातारा : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी व शेतकऱ्यांचा शेतीमाल बाहेर काढण्याकरता शेती रस्त्यांची आवश्यकता असल्याने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सातारा, कोरेगाव, खटाव, कराड तालुक्यातील 30 गावांतील 42 पाणंद रस्त्यांसाठी 7 कोटी 10 लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
कराड उत्तर मतदारसंघातील गावोगावी शेतीसाठी रस्त्यांचे प्रश्न अडचणीचे ठरत होते. अनेक गावांमधील शेतकऱ्यांची पाणंद रस्त्यांसाठी मागणी होती. या रस्त्यांसाठी राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते या योजनेंतर्गत सातत्याने पाठपुरावा करुन विशेष निधी उपलब्ध झाला आहे. खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे जणूबाई मंदिर ते बागवाले वस्ती पाणंद रस्ता करणे, वडगाव जयराम स्वामी येथे चोराडे रोड ते पाटलूचा मळा पाणंद रस्ता करणे, पुसेसावळी येथे हुतात्मा स्मारक ते नारायण चोराडे घरापर्यंत पाणंद रस्ता करणे, राजाचे कुर्ले येथे मुख्य रस्ता ते पळाक शिवार पाणंद रस्ता करणे, गोरेगाव येथे अरविंद शिंदे यांच्या घरापासून ते शिंदे वस्ती नांदणीपर्यंत पाणंद रस्ता करणे, चोराडे येथे नांदणी वस्ती पंढरपूर मल्हार पेठ रोड लगत दत्तात्रय निकम यांच्या शेतापासून मराठी शाळा ते आबासो लोकरे यांच्या घरापर्यंत पाणंद रस्ता करणे.
सातारा तालुक्यातील काशीळ येथे श्रीराम मंदिर ते खापेवाडी नदीपर्यंत पाणंद रस्ता करणे, फत्त्यापूर येथे लाईटचा डीपी ते कॅनॉल मार्गे भैरवनाथ मंदिर पाणंंद रस्ता करणे, अतीत ते सासपडे पाणंद रस्ता करणे, माजगाव येथे 51 मायनर ते बंगला शेत गट नंबर 87 पाणंद रस्ता करणे. काशीळ येथे श्रीराम मंदिर ते खापेवाडी नदीपर्यंत पाणंद रस्ता करणे, अंगापूर तर्फ तारगाव येथे आनंदराव शेडगे ते धोंडेवाडी मावटी पाणंद रस्ता करणे.
कराड तालुक्यातील करवडी येथे तेलकी पाणंद ईश्वर पोळ ते कराड फलटण रोड पाणंद रस्ता करणे, शहापूर येथे शहापूर पाण्याची टाकी ते मसूर कॅनॉल शिवपाणंद रस्ता करणे, अंतवडी येथे सुरेश शिंदे यांच्या शेड पासून ते टाकीपर्यंत पाणंद रस्ता करणे, शिरवडे येथे कृष्णा नाईगडे ते शहापूर ओढा गट नंबर 507 कुयाचा रस्ता पाणंद रस्ता करणे, वाघीण येथे बत्ती चौक ते ब्रिलियंट स्कूलपर्यंत पाणंद रस्ता करणे, चरेगाव येथे तळेगाव भवानवाडी रोड लगत पोपट पवार यांचे घर ते अनिल माने यांच्या घरापर्यंत पाणंद रस्ता करणे,
पुणे गाव येथे जाणारी मार्गे वडोली भिकेश्वर पाणंद रस्ता करणे, कालगाव येथे वाडा वस्ती नवीन गावठाण ते बेलवाडी गट नंबर 668 ते 846 पाणंद रस्ता करणे, खराडे येथे रेल्वे गेट ते पिराचा मळा पाणंद रस्ता गट नंबर 421 ते 768 करणे, मसूर येथे जोतिबा मंदिर ते ओढ्यापर्यंत पाणंद रस्ता करणे, नडशी येथे पडकी विहीर ते कृष्णा नदीपर्यंत सर्वे नंबर 68/73 पर्यंत पाणंद रस्ता करणे, कोपर्डे हवेली कराड येथे पळाक ते कोंडार पाणंद रस्ता करणे, शहापूर तालुका कराड येथे शहापूर पाण्याची टाकी ते मसूर कॅनॉल शिवपाणंद रस्ता करणे, पार्ले तालुका कराड येथे गावठाण उद्यापासून ते माणिक नगर पर्यंत पाणंद रस्ता करणे, निगडी तालुका कराड येथे निगडी गाव ते हेळगाव खिंड रस्ता करणे, मरळी तालुका कराड येथे बेडूक माळ गावठाण ते चोरजवाडी पाणंद रस्ता करणे, करवडी येथे शामगाव पाणंद जोतिबा सुतार ते आरफळ कॅनल पाणंद रस्ता करणे, चिखली येथे गट नंबर 222 ते 437 पर्यंत पाणंद रस्ता करणे,
तासवडे येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे बामणकोट बेट कृष्णा नदीपर्यंत पाणंद रस्ता करणे, वडोली निळेश्वर येथे सुंदर नगर पार्ले हद्दीपासून ते शहापूर हद्दीपर्यंत पाणंद रस्ता करणे, वडोली निळेश्वर गावठाण ते वडोली निळेश्वर डोंगर पाणंद रस्ता करणे, वडोली निळेश्वर तलाव ते वडोलीनेश्वर डोंगर पाणंद रस्ता करणे, वडोली निळेश्वर गावठाण ते करवडी हद्द रस्ता पाणंद करणे, वडोली निळेश्वर करवडी हद्द ते गट नंबर 794 पर्यंत पाणंद रस्ता करणे, करवडी येथे तेलकी पाणंद ते ईश्वर पोळ कराड फलटण रोड पाणंद रस्ता करणे, नडशी येथे पडकी वीर ते कृष्णा नदीपर्यंत सर्वे नंबर 68 ते 73 पर्यंत पाणंद रस्ता करणे, शिरवडे येथे कृष्णत नाईंगडे ते शहापूर घोडा गट नंबर 507 कुयाचा रस्ता पाणंद रस्ता करणे, कोपर्डी येथे पळाक ते कोंडार पाणंद रस्ता करणे, पार्ले येथे गावठाण ते माणिक नगर पर्यंत पाणंद रस्ता करण्यात येणार आहे.
साप, ता. कोरेगाव येथे सातारा डोंगर रस्ता ते भवानी माता मंदिर ते शिवाजी नारायण कदम यांच्या घरापर्यंत पाणंद रस्ता करण्यात येणार आहे. या कामामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. उर्वरित गावांमधील पाणंद रस्तेही टप्प्याटप्याने पूर्णत्वास नेण्याचा मनोदय आ. मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.