सातारा : सातारा शहर परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन अटल गुन्हेगारांना सातारा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून सातारा शहर परिसरातून ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
अबू बखर बादशहा मुलतानी (वय 31, खोजलगी, ता. गोकाक, जि. बेळगाव) , रोहिदास रजपूत (वय 19, रा. रेल्वे स्टेशन समोर कोरेगाव ) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. सातारा शहरामध्ये दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा शहर पोलिसांना याबाबत तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तत्सम गुन्ह्यासंदर्भात तपासाच्या संदर्भाने निर्देशित केले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे,निलेश यादव , सुजीत भोसले यांचे पथक सातारा शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना दोन संशयित आरोपींची माहिती प्राप्त झाली.
पैकी राजपूत याला ताब्यात घेतले असता दुसरा आरोपी हा परराज्यातील असल्याचे समोर आले. डीबी पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून कर्नाटक राज्याच्या हद्दीतून मुलतानी याला ताब्यात घेतले .शहराच्या वेगवेगळ्या भागातून दोन दुचाकी चोरल्याचे दोघांनी कबूल केले आहे. या दोन्ही स्प्लेंडर सातारा शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
या कारवाईमध्ये निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी भाग घेतला होता .या पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी अभिनंदन केले आहे.