'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्याच दिवसापासून अंकिता वालावलकर चर्चेत आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्याचं घरात असणं आणि तिचं टास्कमध्ये खेळणं हे सगळ्यांनाच आवडतंय. तिचा गेम देखील प्रेक्षकांना आवडतो आहे. पण, बिग बॉसच्या घरात अंकितासाठी एक गोष्ट फार कठीण आहे. खुद्द अंकितानेच त्या गोष्टीचा खुलासा केलाय.
अंकिता वालावलकर हिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ती 'बिग बॉस'च्या घरात जाण्यापुर्वी शूट केलेला आहे. यात ती म्हणते, "'बिग बॉस'च्या घरात गेल्यावर माझ्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट काय असणार आहे माहितेय? ती म्हणजे दुपारीच झोप. कारण दुपारी जेवल्यानंतर जेव्हा मी घरी असते, तेव्हा मला लगेच डुलकी लागते", असं अकिंता म्हणाली.
अंकिता व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हणाली, "पण आता झोपून चालायचं नाही. आता झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करणं महत्त्वाचं". अंकिताच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. अंकिता वालावलकर हिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. जो तिला सपोर्ट करत असून तिनेच ट्रॉफी जिंकावी अशी त्यांची इच्छा आहे.
दरम्यान काही दिवसांपुर्वी बिग बॉसच्या घरात अंकितासोबत Eliminationचा प्रँक करण्यात आला होता. रितेशने अंकिताचा प्रवास संपल्याचं जाहीर केलं होतं. अखेर मुख्य प्रवेशद्वार उघडल्यावर अंकिता जेव्हा बाहेर पडत होती. तेव्हा ती सेफ असल्याचं सर्वांना समजलं. प्रवेशद्वाराबाहेर एका आरशाच्या खाली "इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा चांगलं खेळा. अपेक्षा आहेत…या आठवड्यात तुम्ही सेफ आहात" असा संदेश लिहिण्यात आला होता. तिला नॉमिनेशनचं गांभीर्य कळावं म्हणून हा गेम केल्याचं रितेशने सांगितलं.