दहशतवाद्यांचा लष्कराच्या चौकीवर ग्रेनेड हल्ला

by Team Satara Today | published on : 04 December 2024


जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात आज (दि.४) पहाटे दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर दोन ग्रेनेड फेकले. एका ग्रेनेडचा स्फोट झाला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त PTIने दिले आहे. 

सुरनकोट भागात लष्कराच्या छावणीच्या मागे असलेल्या लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांनी दोन ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकले. त्यापैकी एकाचा स्फोट झाला, तर दुसरा स्फोट झाला नाही. शोध मोहिमेदरम्यान एक ग्रेनेड निकामी करण्‍यात आला. तर स्फोट झालेल्या ग्रेनेडचा सेफ्टी पिन लष्कराच्या छावणीच्या भिंतीजवळ सापडला. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्‍यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमृतसर येथील सुवर्णमंदीराबाहेर गोळीबार
पुढील बातमी
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे

संबंधित बातम्या