09:03pm | Mar 04, 2024 |
सातारा : देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय व वैचारिक योगदान लक्षात घेवून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रसरकारकडे प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमित कदम म्हणाले, दिवंगत चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुव तारा आहेत. त्यांच्या विचाराचे वारसदार अनेक राजकीय पक्षात सामाजिक, राजकीय जवाबदारीने काम करत आहेत. त्यांच्यासारख्या बहूजन समाजाचे हित जोपासणाऱ्या महान नेत्याचा गौरव व्हावा, अशी सर्वांची भावना आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व वैचारिक वारसदारांना एकत्रित करून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्काराबाबत सामूहिक प्रयत्न करून करण्यात येणार आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १११ वी जयंती १२ मार्च रोजी आहे. त्यानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जयंती सप्ताह दि. ७ ते १२ या कालावधीमध्ये साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. या कालावधीत यशवंतराव चव्हाण यांचे विचार व कार्य यांचा प्रसार व्हावा, तसेच त्यांनी महाराष्ट्रासाठी व देशासाठी जे योगदान दिले आहे, याची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |