परवानगी न घेता आदेशाचे उल्लंघनप्रकरणी सर्कस व्यवस्थापकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्कस व्यवस्थापकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता विनापरवाना कोटेश्वर मैदान, शुक्रवार पेठ, सातारा येथे न्यू गोल्डन सर्कसचे खेळ सुरू करून अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी समाधान रामचंद्र जेधे (रा. मु. पो. मोड निंब, ता. माढा, जि. सोलापूर) या गोल्डन सर्कसच्या व्यवस्थापकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शेख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात खंडणीसह मालमत्तेचे केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
बेकायदेशीर मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या