नवरात्रोत्सवात सातार्‍यात होणार दुर्गामाता दौड

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकार्‍यांची पत्रकार परिषदेत माहिती

by Team Satara Today | published on : 18 September 2025


सातारा  : नवरात्रोत्सवात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सातारा शहरात दि. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान शहरातील विविध मार्गावरून रोज दुर्गामाता दौड होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी धनंजय खोले, प्रवक्ते राहुल इंगवले, अभिजित बारटक्के, शहरप्रमुख अजिंक्य गुजर व तालुकाप्रमुख शुभम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

घटस्थापनेदिवशी सोमवारी (दि. 22) सकाळी 6 वाजता या दुर्गादौडीची सुरुवात होणार आहे. दुर्गामाता मंडळांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी या दौडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून, त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 22) शिवतीर्थ ते तुळजाभवानी मंदिर, रविवार पेठ भाजी मंडई, अजिंक्य कॉलनी ते शिवतीर्थ अशी दौड होणार आहे. आजच्या पिढीमध्ये हिंदू धर्माची अस्मिता आणि प्रतिष्ठा तयार व्हावी आणि आपल्या धर्माविषयीची जागरूकता त्यांच्या वर्तनातून प्रतीत व्हावी, यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली आहे. ही दौड दरवर्षी संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येते. तरुण पिढीत धर्मभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा रुजवणे, हे या दौडीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

दुर्गामाता दौडीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - मंगळवार, दि. 23 सप्टेंबर शिवतीर्थ ते शाहूनगर, कामाठीपुरा, गोडोली, गोळीबार मैदान, बुधवार, दि. 24 सप्टेंबर शिवतीर्थ ते केसरकर पेठ, गुरुवार पेठ, चुना गल्ली, पोलीस वसाहत, गुरुवार, दि. 25 सप्टेंबर शिवतीर्थ ते ललिता हाऊसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी, भारतमाता मंडळ, सदरबझार, शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर शिवतीर्थ ते भूविकास बँक चौक, करंजे आणि तेथून परत, शनिवार, दि. 27 सप्टेंबर राजवाडा गोल बाग ते शाहूपुरी, रविवार, दि. 28 सप्टेंबर गोल बाग ते शुक्रवार पेठ, गडकर अळी, व्यंकटपुरा पेठ, मोरे कॉलनी, मंगळवार तळे, पंचपाळी हौद, सोमवार, दि. 29 सप्टेंबर गोल बाग ते मंगळवार पेठ, ढोणे कॉलनी, बोगदा, समर्थ मंदिर, जंगी वाडा, यादोगोपाळ पेठ, पंचपाळी हौद, मंगळवार, दि. 30 सप्टेंबर गोल बाग ते सोमवार पेठ, माची पेठ, शनिवार पेठ, भवानी पेठ, राजपथ, बुधवार, दि. 1 ऑक्टोबर गोल बाग ते प्रतापगंज पेठ, जुनी मंडई, 501 पाटी, बुधवार पेठ, गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर गोल बाग ते मोती चौक, 501 पाटी, शेटे चौक, कमानी हौद, राजपथ, सुरुची बंगला, जलमंदिर.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सॅटर्डे क्लबतर्फे साताऱ्यात इंजिनियर डे व प्रदर्शनाचे आयोजन
पुढील बातमी
सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशनचा स्नेहमेळावा उत्साहात

संबंधित बातम्या