सातारा : नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तपोवन मधील 800 झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाचा सातारा जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी निषेध केला आहेत. 'वन वाचवा झाडे वाचवा पर्यावरण वाचवा' अशा घोषणा साताऱ्यात पोवई नाक्यावर निनादल्या
या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, युवा राज्य फाउंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे, वृक्षवल्ली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव असे अनेक सामाजिक व पर्यावरणप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते. येथील शिवतीर्थाच्या परिसरात पर्यावरण वाचवा अशा आशयाचे फलक झळकवून पर्यावरणप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला. पर्यावरण प्रेमींनी मानवी साखळीचे आवाहन केले होते मात्र प्रत्यक्ष निषेध आणि महापालिकेला अल्टीमीटर अशा ठोस भूमिका यावेळी घेण्यात आल्या.
या आंदोलनाच्या संदर्भाने बोलताना सुशांत मोरे म्हणाले, नाशिक महानगरपालिकेने तपोवन आतील 800 झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे हा अगदी पर्यावरणाच्या विरोधातला निर्णय आहे. झाडांची लागवड आणि त्याचे संवर्धन हा कालातीत चालणारा विषय आहे त्यामुळे पुन्हा नव्याने खड्डे करून वृक्षारोपण करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा खोटा कांगावा करणे चुकीची आहे. तपोवनासाठी नाशिक महानगरपालिकेने पर्यायी जागा शोधाव्यात, तपोवनाच्या निमित्ताने त्या वनक्षेत्रातील अन्नसाखळी आणि तेथील परिस्थितीकी अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे .नाशिक महापालिकेने यासंदर्भातयोग्य तो निर्णय घ्यावा नाशिक महापालिकेला यासाठी सात दिवसाची मदत देण्यात येत आहे अन्यथा यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.