सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष वेगवेगळे लढल्याने मतांमध्ये मोठी विभागणी झाली असल्याचे पडलेल्या मतांनी लक्षात आले आहेत. जिल्हयाच्या हितासाठी व विकासासाठी सर्वपक्ष मिळून सर्वसमावेशक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा शहर संघटनेच्यावतीने तलवार भेट देण्यात आली.
साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये जिल्हा परिषद व पंच्यात समिती विजयी उमेदवार यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. महेश शिंदे, माजी आमदार दिपक चव्हाण, कराड संपर्कप्रमुख शरद कणसे, कराड नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओबळे, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, शहर प्रमुख निलेश मोरे, शहर संघटक अमोल इंगोले, समीर गोळे, निखिल शिंदे, यशराज मोरे आदी उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, जिल्हयात महायुतीत सर्व काही व्यवस्थित सुरु असताना भाजपच्या मंत्र्यांनी घटकपक्षात असणाऱ्यांना मंत्र्यांना डिवचायला सुरुवात केली असा गोष्टी होत राहतात. जिल्हयात भाजपला २७, शिवसेनेला १५ तर राष्ट्रवादी पक्षाला २० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंग झाले. शिवसेनाना जिल्हा परिषदेवर १५ जागांवर तर त्याच्या डबल म्हणजे २९ पंचायत समिती उमेदवार विजयी झाले. सातारा शहर संघटनेच्यावतीने निलेश मोरे यांनी ना. देसाई यांना तलवार भेट देण्यात आली. यावेळी आगामी ग्रामपंचातीवर जास्तीत जास्त शिवसेचा धनुष्यबाण दिसला पाहिजे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमांस जिल्हयातील पदाधिकारी व नवनियुक्त सदस्य, शिवसैनिक उपस्थित होते.