सातारा : शाहूनगर येथे अज्ञात चोरट्याने दोन लाखाची घरफोडी केल्याची फिर्याद साता शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगरमधील ग्रिनसिटी अपार्टमेंटमधील घर फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे दागिणे लंपास केले आहेत. याबाबत अब्दुल इमाम सय्यद (रा. ग्रिनसिटी अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील लॉकरमधील दिड तोळे सोन्याचे गंठण, सोन्याच्या रिंगा, झुबे असे दोन लाख दोन हजार रुपये किमतीचे दागिणे चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.
शाहूनगर येथे दोन लाखाची घरफोडी
by Team Satara Today | published on : 02 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा