आजकालचा हवामान बदलल्यावर सर्दी-खोकला फुफ्फुसांवर जास्त परिणाम होतो. तुमच्या कमजोर फुफ्फुसांमुळे तुम्हाला खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि थकवा येतो. जर तुम्ही ही खास फळे खाल्लीत तर तुमचे फुफ्फुस नैसर्गिकरित्या मजबूत होतील.
सफरचंद हे सर्वात हेल्दी फळ मानलं जातं. त्यामध्ये असलेले फ्लेवोनॉयड्स व्हिटॅमिन C आणि फायबर फुफ्फुसांचे सरंक्षण करतात आणि त्यांना हानीपासून वाचवतात. जर तुम्ही दररोज एक सफरचंद खाल्ला तर तुमचे फुफ्फुस बळकट होतील आणि खोकल्याची समस्या कमी होईल.
जर तुम्ही वारंवार खोकल्याने त्रस्त असाल तर संत्रा जरूर खा. संत्र्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे फुफ्फुसांना संसर्गापासून बचाव करतं.
काळ्या द्राक्षात असलेले रेस्वेराट्रॉल आणि अँटीऑक्सीडेंट्स तुमच्या फुफ्फुसांच्या पेशींना स्वच्छ आणि मजबूत करतात.
दररोज तुम्ही डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमच्या फुफ्फुसांची सूज कमी होण्यास मदत होईल. तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं आणि रक्त शुद्ध करतं.
जर तुम्हाला वारंवार खोकला होत असेल तर तुमच्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन A आणि एंजाइम्स असतात ज्यामुळे तुमच्या पेशींना दुरुस्त करतं.
जर तुम्ही नियमितपणे किवी खाल तर तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होईल आणि हे तुमच्या श्वसन नलिकांना स्वच्छ ठेवतील. यात खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.