डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणार 500 ई जात प्रमाणपत्रांचे वितरण

सामाजिक कल्याण विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन : सहाय्यक आयुक्त सुनील जाधव

by Team Satara Today | published on : 08 April 2025


सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी साजरा होणार्‍या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक सप्ताह दिनांक 8 ते 14 एप्रिल दरम्यान राबवला जाणार आहे. या निमित्ताने पथनाट्य, जनजागृतीपर कार्यक्रम, मेळावे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ऑनलाईन 500 जात पडताळणी दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह निमित्त 8 ते 14 एप्रिल या सप्ताहात विविध कार्यक्रम होत आहेत. यामध्ये 9 एप्रिल रोजी विविध शाळांमधून शासकीय कार्यालयामधून वक्तृत्व, निबंध, लघुनाट्य स्पर्धा होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित या स्पर्धा होणार आहेत. त्यांना विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. 10 एप्रिल रोजी पथनाट्य लघुनाटिकाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुधारणा तसेच मार्जिन मनी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटप दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे आणि फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी जाहीर कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. 12 एप्रिल रोजी संविधान निर्मिती अनुच्छेद विशेषतः मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य या विषयी व्याख्यान दिले जाणार आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी सर्व शाळा, महाविद्यालय येथे जनजागृती शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, आरोग्य उपचार शिबिर आयोजित केले जाणार आहे.

दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पोवई नाका यादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार असून त्या निमित्ताने व्याख्याने, चर्चासत्रे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.  यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित केला जाणार असून त्यामध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याच दिवशी जात पडताळणी विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन 500 जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण होणार आहे. गेल्या वर्षभरात तब्बल साडेतीन हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच समाज कल्याण विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरात शंभर टक्के निधी खर्च करण्यात आल्याचे सुनील जाधव यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पेन्शन अदालतीत सेवानिवृत्तांच्या प्रश्नांवर चर्चा
पुढील बातमी
पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात अडथळा प्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या