वीज चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 November 2024


सातारा : वीज चोरीप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवे, ता. सातारा येथील रोहित संजय घोरपडे, सर्जेराव भिकू शेलार (हॉटेल पुष्कराज) यांनी वीज चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर महावितरण विभागाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार माने तपास करत आहेत.

तसेच, गजवडी, ता. सातारा येथील नंदकुमार मानसिंग कदम यांनीही वीज चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार निकम तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारू विक्रेत्यांवर कारवाई
पुढील बातमी
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या