सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुश्रित तानाजी सावंत रा. सदर बाजार, सातारा याला जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले असताना तो कोणत्याही परवानगीशिवाय आदेशाचा भंग करून कोयना सोसायटी सदर बाजार सातारा येथे दि. 27 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.