कराड शहरातील 10 बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त करा !

शिवशंकर स्वामी यांची जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

by Team Satara Today | published on : 01 August 2025


सातारा : कराड शहरामध्ये अवैधरित्या सुरु असणारे कत्तलखाने उद्ध्वस्त करा, अशा आशयाचे निवेदन मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिले आहे.

स्वामी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड शहरात मुजावर कॉलनी, ईदगाह मैदान, सुर्यवंशी मळा, नूर मोहल्ला आदी ठिकाणी एकुण 10 लहान-मोठे बेकायदेशीर व अनधिकृत कत्तलखाने आहेत. याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल केली जात आहे. हे कत्तलखाने उध्वस्त करण्यात यावेत, यासाठी तीन वेळा अर्ज देऊन देखील कराड नगरपरिषदकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानिमित्ताने कराड नगरपरिषद गोमाफियांना पाठीशी घालत आहे का, अस प्रश्न समस्त कराडकरांना पडत आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची समक्ष भेट घेऊन तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना याबाबत निवेदन देण्यात आले व सविस्तर माहिती दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त होतील, असा विश्वास शिवशंकर स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा मंडप असोसिएशन कार्यकारणी बिनविरोध
पुढील बातमी
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या