सातारा : म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनीशहरात एकतर्फी व मनमानी कारभार सुरू ठेवला आहे .याची वारंवार तक्रार करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातारा दौऱ्यात लक्ष वेधण्यासाठी आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत, असा इशारा म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश करचे बाळराजे वीरकर व डॉ. प्रसाद ओंबासे यांनी दिला आहे.
येथील जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करचे बोलत होते. करचे पुढे म्हणाले सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड शहर पोलीस स्टेशन अक्षय सोनवणे यांच्या एकतर्फी मनमानी कारभाराला येथील जनता कंटाळली असून भयभीत झाली आहे .पत्रकार तुषार खरात यांच्यावर दाखल अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी मनमानीपणा केला आहे .खरात यांना जामीन होताना त्यांच्या मनमानीपणाचा बुरखा न्यायालय यंत्रणेनेच फाडला आहे. सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने विरोधकांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र सोनवणे यांनी केले आहे.
सोनवणे यांच्या असल्यामुळे येथील कोणत्याही निवडणुका पारदर्शी पद्धतीने पार पडत नाहीत त्यांना तात्काळ हटवले जावे अशी मागणी करूनही वरिष्ठ पोलीस यंत्रणा त्यांना पाठीशी घालत आहे. या वस्तुस्थितीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांच्या दौऱ्यात बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत. तसेच आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका मी स्वतः उतरणार आहे तेव्हा अक्षय सोनवणे व माझा सामना ठरलेला आहे, असा इशारा करचे यांनी दिला आहे.