अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

by Team Satara Today | published on : 20 July 2025


सातारा : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. 22 ) रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी महा आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबिरे, मोतिबंदू व नेत्र तपासणी शिबीर, हृदय विकार- मेंदू विकार, बायपास शस्त्रक्रिया, व इतर शस्त्रक्रियेबाबत तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर आजारांची मोफत तपासणी करून सर्वप्रकारचे औषधोपचार केले जाणार आहेत.ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप, वृद्धाश्रमात अन्नदान आणि मतिमंद मुलांच्या शाळेत खाऊ वाटप केले जाणार आहे.यासोबतच सातारा जिल्हा जिल्हा क्रीडा संकुलात  भव्य बॅडमिंटन स्पर्धा, विविध ठिकाणी वृक्षारोपण यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच व्याख्यानमालाही आयोजित केली आहे.या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यस्तरीय जलजीवन मिशन संघटनेची सातारमध्ये घोषणा
पुढील बातमी
अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या