आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा कच्च्या पपईची चटणी

by Team Satara Today | published on : 20 January 2025


निरोगी जीवन जगताना शरीर निरोगी असणे फार गरजेचे आहे. शरीरात विषारी घटक साचून राहिल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पोट स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. लहान मुलांसह मोठ्यांना रोजच्या जेवणात वेगवेगळ्या चटण्या खायला खूप आवडतात. खोबऱ्याची चटणी, आवळ्याची चटणी, हिरव्या मिरचीची तिखट चटणी, शेंगदाण्याची चटणी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्ही खाल्ल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्च्या पपईची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कच्चा पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पपई खाल्यामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया कच्च्या पपईची चटणी बनवण्याची कृती.

साहित्य:

कच्चा पपई

कांदा

लसूण

हिरवी मिरची

लिंबाचा रस

आलं

मीठ

मोहरी

हिंग

तेल

कढीपत्ता

कृती:

कच्च्या पपईची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपई स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून तुकडे करा.

पपई व्यवस्थित बारीक किसून घ्या, जेणेकरून पपई शिजण्यास जास्त वेळ लागणार नाही.

कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची पाने टाकून शिजवून घ्या.

नंतर त्यात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं,लसूण आणि कांदा टाकून लालसर होईपर्यंत व्यवस्थित परता.

कांदा लाल झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. नंतर पपई टाकून शिजवून घ्या.

सगळ्यात शेवटी त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कच्च्या पपईची चटणी.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी
पुढील बातमी
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणार साहित्य पुरस्कार

संबंधित बातम्या