सातारा : कातवडी येथे सुमारे 28 हजारांची घरफोडी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कातवडी, पोस्ट नित्रळ ता.सातारा येथे अज्ञात चोरट्याने घरातून 27 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. 10 ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मी रामचंद्र लोटेकर (वय 47, रा.कातवडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी घरातून अंगठ्या, सोन्याची चेन असा मुद्देमाल चोरुन नेला. प्राथमिक माहितीनुसार दोन चोरटे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.