भाजपयुमोतर्फे नमो युवा रन’ सातार्‍यात उत्साहात; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; 2500 स्पर्धकांनी भाग घेतला

by Team Satara Today | published on : 21 September 2025


सातारा  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपयुमोतर्फे ‘नमो युवा रन राजधानी सातारा’ रविवारी उत्साहात झाली. या उपक्रमात 2500 स्पर्धकांनी भाग घेतला. पोलीस कवायत मैदान, शिवतीर्थ, शाहू चौक, मोती चौक, गोल बाग, पोलीस मुख्यालय, शिवतीर्थ व पुन्हा पोलीस कवायत मैदान अशी 5500 मीटर अंतराची ही स्पर्धा स्पर्धकांनी पूर्ण केली.

संयोजन समितीचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, सुनील काटकर, अविनाश कदम, सोमनाथ धुमाळ, संग्राम बर्गे, संदीप शिंदे, चिन्मय कुलकर्णी, संतोष कणसे, धनाजी पाटील, बाळासाहेब खरात, पंकज चव्हाण, समीर निकम, डॉ. दयानंद घाडगे, डॉ. नीलेश थोरात, विकास गोसावी, लक्ष्मण कडव, प्रवीण धस्के, अमोल सणस, कल्याण राक्षे, शफी इनामदार, हृदयनाथ पार्टे, अविनाश खर्शीकर, वैशाली टांकसाळे, राजेंद्र बर्गे यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले. राजू शेळके व सागर निंबाळकर हे ब्रँड अँबॅसडर होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी भाजप नेते रामकृष्ण वेताळ, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने-कदम, सुवर्णा पाटील, भारत जंत्रे, अमित भिसे, विठ्ठल बलशेटवार, हर्षवर्धन शेळके, रोहित सावंत, अमोल कांबळे, गौरव इंगवले, कु. पायल जाधव, दीपक फाळके, विशाल कुलकर्णी, विशाल घोरपडे, ओंकार पाटील, अक्षय थोरवे, गणेश जायगुडे, वैभव सकुंडे, प्रवीण शिंदे, शिवम सूर्यवंशी, नीलेश भोसले, प्रशांत पोतेकर, संदीप माने, तेजस कदम, आशिष सकुंडे, प्रशांत जाधव, सनी साबळे, अनिकेत निकम, यशोवर्धन मुतालिक, श्रीधर हादगे, अक्षय चांगण, रोहिदास नवसरे, इम्तियाज मुलाणी, यश माने, रत्नदीप जाधव, हर्षल गुरव, ऋषीकेश पाटील, प्रथमेश इनामदार, नरेंद्र सावंत, प्रथमेश मोरे, प्रवीण शहाणे, राहुल शिवनामे, विक्रांत भोसले, विक्रम बोराटे, रिना भणगे, नीता रणदिवे, वृषाली दोशी, सुचरिता कंडारकर, गौरी गुरव, वैष्णवी कदम, रोहिणी क्षीरसागर, नंदा इंगवले, निशा जाधव, अश्विनी हुबळीकर उपस्थित होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोल्हापूर विभागीय संघाने पटकावली ७ सुवर्ण, ४ रौप्य, १ कांस्य पदके
पुढील बातमी
जिल्हा रुग्णालय परिसरातून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या