सातारा : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी राजाराम मारुती साबळे रा. संगम माहुली, पोस्ट क्षेत्र माहुली, सातारा हे रस्ता अपघातात जखमी झाल्याने त्यांना सिटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा