शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी

by Team Satara Today | published on : 21 December 2024


सातारा : शाहूनगरमधील नाथप्रसाद गणेश हौसिंग सोसायटीमधील घरात अज्ञातांनी घरफोडी केली. त्यात सुमारे 95 हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना दि. 19 रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रसाद भालचंद्र आपटीकर (रा. शाहूनगर, सध्या. रा. सहकारनगर, पर्वती, पुणे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साने, चांदी, रोख रक्कम असा 95 हजारांचा ऐवज चोरला आहे. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल
पुढील बातमी
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल

संबंधित बातम्या