रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेस महिला आघाडीच्या संध्या सव्वालाखे यांची मागणी, महिला कॉंग्रेसच्या उपोषणास पाठींबा

by Team Satara Today | published on : 02 November 2025


सातारा  :  डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर येऊन गेल्यानंतर त्यांनी वक्तव्य केले आहे, ते निषेधार्ह आहे, संबंधितांनी रुपालीताई चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी व्यक्त केलिी. 

जल्ह्यिातील महिला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी येथील जल्हिाधिकारी कार्यालयासमोर बसून साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे. त्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता, त्याला पाठिंबा देण्यासाठी त्या सातारा येथे आल्या होत्या त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पृथ्वीराज साठे, जल्हिाध्यक्ष रणजित देशमुख, महिला काँग्रेसच्या जल्हिाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, प्रदेश सरचिटणीस उज्वला साळवे, ॲड. मनिषा रोटे, अनिता जाधव, मालन परळकर, धनश्री मालुसरे, अनिता भोसले, प्राची तागतोडे, रजनी पवार यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संध्या सव्वालाखे म्हणाल्या, फलटणच्या संबंधित पीडित डॉक्टर युवतीला तच्यिा कुटुंबीयांनी कुटुंबाची हलाखीची परस्थितिी असताना तिला वैद्यकीय शक्षिण देऊन डॉक्टर बनवले. मात्र, सरकार आणि येथील व्यवस्थेने तिला आत्महत्तेस प्रवृत्त केले. येथील सर्व परस्थितिी संशयास्पद आहे. संबंधित युवतीच्या आत्महत्येनंतर तच्यिाविषयी अपशब्द वापरले जातात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे येऊन संबंधितांना क्लीन चीट देतात. या प्रकरणाचा तपास नेमकं कोण करतयं ? हे कळेनासे झाले आहे. जयकुमार गोरेंसह सरकारचे मंत्री तपास अधिकारी, जज असल्यासारखे वक्तव्य करत आहेत. त्यांना चॅट वाचायचा अधिकारी कोणी दिला? त्या दिवशी आत्महत्या झाल्याचा प्रकार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला, मग त्या डॉक्टर युवतीचा मोबाईल अकरा वाजता ऑनलाईन कसा ? हा प्रश्न आहे. हा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे की जयकुमार गोरेंच्या ताब्यात आहे? आत्महत्येपूर्वी युवतीने हातावर लिहिलेला जो पेन आहे तो पोलिसांनी जमा केला आहे का ? केला असल्यास पोलिसांनी त्याचा खुलासा करावा. नुकत्याच या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या तपासी पोलिस अधिकारी यांनी यापूर्वी याठिकाणी काम केले असल्याने त्यांच्यावरही दबावाची दाट शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाचा नि:पक्षपातीपणे तपास होईल की नाही ? याबाबत शंकाच आहे.

या राज्य सरकारच्या काळात महिला, युवती सुरक्षित नाहीत. मात्र, या प्रश्नावर भाजपच्या महिलामंत्री पंकजाताई मुंडे, चत्रिा वाघ या प्रकरणावर काही बोलत नाहीत. याउलट एस आयटी स्थापन झाल्यावर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतात, असे देवाभाऊंनी काय केलं ? की त्यांचे आभार मानावे लागत आहेत, संबंधित युवतीच्या आत्महत्येनंतर तच्यिाविषयी अपशब्द बोलणाऱ्या रुपालीताई चाकणकर यांच्यावर का कारवाई होत नाही ? देवाभाऊ त्यांची का राखण करत आहेत ? असा उपरोधिक सवाल सव्वालाखे यांनी यावेळी उपस्थित केला. फलटण उपजल्हिा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्तेनंतर येथे येऊन तच्यिाविषयी अपशब्द बोलणाऱ्या रुपालीताई चाकणकर यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार का राजीनामा मागत नाहीत ? त्यांच्या पश्चात अन्य महिला पदाधिकारी आहेत की नाही ? एवढी वाईट अवस्था त्यांच्या पक्षावर आली आहे का ? असा सवाल सव्वालाखे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे पक्ष निरीक्षक पृथ्वीराज साठे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील महिला, युवती वर्गात असुरक्षिततेचे वातावरण आहे.  यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
येत्या निवडणुकांत काँग्रेसचे अस्तित्व पूर्व पदावर आणण्यासाठी निर्णय घेतले जातील : पक्ष निरीक्षक पृथ्वीराज साठे यांचा साताऱ्यात विश्वास
पुढील बातमी
मलकापुरात जुन्या भांडणातून गुप्तीने भोकसून मित्राचा खून; एकास अटक

संबंधित बातम्या