सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या बऱ्याच वर्षापासून फरारी असलेले दोन अट्टल गुन्हेगार शनिवारी जेरबंद केले. या दोन्ही कारवाया सातारा शहर परिसरामध्ये करण्यात आलेल्या आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अभिलेखावरील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सातारा शहर पोलीस ठाण्याला हवा असलेला विविध गुन्ह्यातील पाच वर्षापासून परागंदा असलेला आरोपी अकिब जावेद कासम साहेब नंदगळकर राहणार निसर्ग कॉलनी, बुधवार नाका हा साताऱ्यात आल्याची माहिती मिळाली. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने निसर्ग कॉलनी बुधवार नाका येथून ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दिनांक 22 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला व दोन वर्षापासून गायब असलेला आरोपी प्रीतम अशोक पवार याला आझाद नगर शाहूपुरी येथून ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, ओंकार यादव, मोहन पवार, अमित माने, विशाल पवार यांनी सहभाग घेतला होता.
दोन अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
by Team Satara Today | published on : 22 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा