कोल्हापूर परिक्षेत्राच्या कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलिसांना जनरल चॅम्पियनशिप

नऊ सुवर्ण, सात रौप्य, चार कांस्य पदकाची कमाई

by Team Satara Today | published on : 22 July 2023


सातारा : कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पाच जिल्ह्यातील पोलिसांच्या कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलिसांनी नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पद मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामुळे सातारा जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप चा मान मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी 22 जणांनी भाग घेतला होता.
पोलीस दलामध्ये अधिकारी आणि अंमलदार यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाचा हा मेळावा दिनांक 19 जुलै ते 21 जुलै या दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सातारा, सांगली, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सोलापूर अशा पाच जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्यातून पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस निरीक्षक अनिता आमंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मेनकर व 22 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
या मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टू इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडिओग्राफी, घातपात विरोधी तपासणी, कम्प्युटर अवेअरनेस आणि श्वान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्हा संघाने एकूण नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पक्षाने टाकलेला विश्वास सक्षमतेने सार्थ ठरवणार
पुढील बातमी
राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने कातर खटाव येथे रस्ता रोको आंदोलन

संबंधित बातम्या