सुर्ली येथे आमदार केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

हिंदकेसरी फौंडेशनच्यावतीने १८, १९ मे रोजी आयोजन

by Team Satara Today | published on : 12 May 2025


सातारा : कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे आणि युवा मल्ल अथर्व वेताळ, सम्राट वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदकेसरी फाउंडेशनच्यावतीने १८ आणि १९ मे रोजी सुर्ली (ता. कराड) येथे राज्यस्तरीय आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ग्रामीण भागात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. राज्यातील गुणवंत मल्ल्यांच्या खेळाचा आनंद ग्रामीण भागातील लोकांना मिळावा नवोदित उदयोन्मुख पैलवानांना कामगिरी दाखवण्याची संधी मिळावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा माती विभागात होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने कराड तालुका कुस्तीगीर संघ आणि हिंदकेसरी फौंडेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ८५ किलोच्या पुढे ओपन गटातील विजेत्यास आमदार केसरी किताब आणि रोख २५ हजार बक्षीस, उपविजेत्यास १५ हजार तृतीय क्रमांकास १० हजार रुपये, ७२ ते ८५ किलो गटांसाठी अनुक्रमे १५ हजार, ७ हजार,४ हजार, ६० ते ७२ किलो गटांसाठी अनुक्रमे ७ हजार, ४ हजार, ३ हजार रुपये, ५० ते ६० किलो गटांसाठी अनुक्रमे ४ हजार, ३ हजार, २ हजार, ४० ते ५० किलो गटांसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार, ३५ ते ४० किलो गटांसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार, २ हजार, ३० ते ३५ किलो वजन गटांसाठी अनुक्रमे २ हजार, १ हजार, १ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी मल्ल प्रशिक्षक आणि कुस्ती शौकीन यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदकेसरी फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या कराड तालुका कार्याध्यक्षपदी सागर लादे
पुढील बातमी
आनेवाडी टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर लूटमारीचे प्रकार

संबंधित बातम्या