सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक महिला जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरती खंडू हिरवे रा. विकास नगर, सातारा या त्यांच्या दुचाकीवरून जुनी एमआयडीसी ते गणेश चौक जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात त्या जखमी झाल्या असून या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.