प्रा. प्राजक्ता शिंदे-सरकाळे यांना पीएचडी प्रदान

by Team Satara Today | published on : 03 October 2025


सातारा : कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठात पर्यावरण शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या सौ डॉ. प्राजक्ता रजत शिंदे -सरकाळे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

" Evaluation of Antibiotic Residue in Surface Waters of Kolhapur city , it's Potential for Development of Anti - Microbial Resistance and Eco - Toxicological Impacts " असा डॉ.  प्राजक्ता शिंदे - सरकाळे यांच्या प्रबंधाचा विषय आहे.‌ डॉ. आसावरी जाधव या त्यांच्या मार्गदर्शक होत्या. 

कृष्णा विश्व विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ प्राजक्ता शिंदे- सरकाळे यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रवेश घेतला. त्या सेट, नेट या परीक्षा सुद्धा त्या उत्तीर्ण आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टि. शिर्के, तसेच राजेंद्र शिंदे (वेळे कामथी) व हिंगनोळे येथील संभाजी सरकाळे आदींनी अभिनंदन करुन  शुभेच्छा दिल्या आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जमियत आणि खिदमत ए खलक साताराने दसरानिमित्त घडविले माणुसकीचे दर्शन
पुढील बातमी
साताऱ्यात आजपासून सहस्रचंडी यागाला प्रारंभ

संबंधित बातम्या