08:34pm | May 02, 2024 |
सातारा : रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण करणारा साताऱ्याचा गुलमोहर महोत्सव येथील सेंट थॉमस चर्चमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा झाला. दरवर्षी कालिदास पेट्रोल पंपाच्या परिसरात भरणारा हा महोत्सव यंदा सदर बाजार येथील सेंट थॉमस चर्चमध्ये रंगला.
कॅलिग्राफी, शिल्पाकृती, वेगवेगळ्या रंगांच्या चित्रकृती, कवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांना सातारकरांनी आणि येथील रंगकर्मी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील चित्रकला कार्यक्रमांमध्ये सातारा जिल्ह्यासह वेगवेगळ्या शहरातील 500 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
एक मे हा गुलमोहर डे म्हणून साजरा करणारे सातारा हे जगातील एकमेव शहर आहे. 1999 सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जात आहे. बुधवारी एक मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सदर बाजारातील सेंट थॉमस चर्चमध्ये गुलमोहोर डे साजरा होत असताना सुमारे 500 रंगकर्मीनी प्रतिसाद दिला. कॅनव्हास वर वेगवेगळ्या गुलमोहराची अनेक वेगवेगळ्या रंगातील चित्रे अत्यंत आकर्षक पद्धतीने प्रकट झाली.
गुलमोहर परिवाराचे सदस्य सागर गायकवाड, कबीर गायकवाड, पीव्ही तारू इत्यादी संयोजकांनी या महोत्सवाचे नेटके संयोजन केले होते. बेंगलोरच्या वसुंधरा शालगर, मुंबईचे नंदू टार्टर, वडूजचे दिनेश माने, कॅलिग्राफी आर्टिस्ट ओंकार पाटील, इंटरनॅशनल चित्रकार अमित ढाणे इत्यादी रंगकर्मींनी वेगवेगळ्या प्रयोगातून गुलमोहर महोत्सवाला चार चांद लावले.
यंदा सातारा-पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अनेक गुलमोहराच्या झाडांची कत्तल झाली. त्यामुळे यंदा प्रथमच गुलमोहर महोत्सवाचे ठिकाण बदलण्यात आले होते. सेंट थॉमस चर्च प्रांगणातल्या गुलमोहरांच्या अनेक झाडांखाली हा महोत्सव अत्यंत आकर्षक पद्धतीने रंगला. कॅलिग्राफी ओंकार पाटील आणि शिल्पज्ञ नंदू स्टार्टर यांच्या वेगवेगळ्या कलाकृतींना सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सायंकाळी पर्यावरण, निसर्ग तसेच प्रेम कविता व्यक्त करणारे काव्य संमेलन उस्फूर्तपणे रंगले. सुमारे 25 हून अधिक कवींनी या महोत्सवात भाग घेतला होता.
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |