सातारा : जैतापूर, ता.सातारा येथे अपघात प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहन सुधाकर कुमकर (वय 23, रा.) या युवकाने अज्ञात कार चालकाविरुध्द तक्रार दिली आहे. मावस भाऊ प्रसाद हणमंत जाधव (वय 22, रा.भोसरे ता.खटाव) याच्या दुचाकीला जैतापूर येथे अज्ञात कारची धडक बसली. यामध्ये प्रसाद जाधव हा जखमी झाला आहे. अपघातानंतर कार चालक न थांबता तेथून निघून गेला.