सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील करंजे नाका येथील पान टपरीच्या आडोशास शेखर राजाराम परदेशी रा. सातारा रोड, ता. कोरेगाव जि. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1090 रुपयांचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.