मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला 230 जागांवर दणदणीत यश मिळाले. पण महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं. अनेक संस्थांनी गेल्या निवडणुकीसाठी केलेल्या सर्वेक्षणांमधून अटीतटीची लढाई होणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. पण यंदाच्या विधानसभा निकालाने महाविकास आघाडीलाच धक्काच नव्हे तर महाविकास आघाडीत भूकंपच घडवून आणला. त्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडून निकालावर आणि ईव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप घेण्यास सुरूवात झाली. अनेक उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील इव्हीएम मशीन आणि मतमोजणी केंद्रावरही गडबड झाल्याचा दावा केला. यासंदर्भात अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर फिरू लागले. या सर्व घडामोडींनंतर राज्यातील विरोधी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ईव्हीएम विरोधात नव्या जनजागृतीची हाक दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशी पायी ‘भारत जोडो’ काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून देशभरात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न होता. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. यानंतर आता राज्यासह काँग्रेसकडून ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या यात्रेची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत इव्हीएम संदर्भातही बैठक झाली. यात शिवसेनेच्याही अनेक उमेदवारांनी इव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप नोंदवले. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्च करून भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.
निकालानंतर विरोधी महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कायदेशीर लढाई लढण्यासाठीदेखील तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ईव्हीएम विरोधात लढा उभा करायचा. आता मागे हटायचं नाही, कायदेशीरच नव्हे तर रस्त्यावरचीही लढाई लढायची. त्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.
ठाकरे गटाचे नेते राजन विचारे म्हणाले की, निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रात आठ- पंधरा दिवस आधीपासून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे दिसत होते. लोकांचाही प्रतिसाद दिसत होता. कित्येक ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. काही ठिकाणी 99 टक्के बॅटरी असलेल्या मशीन आढळून आल्या. इव्हीएम विरोधात राज्यभरातून निवडणूक आयोगाकडे एवढया तक्रारी जाऊनही आयोगाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अनेक ठिकाणी मतदारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी दिल्या होत्या. असंच चालू राहिलं तर एक दिवस देशातील लोकशाही संपून जाईल, त्यामुळे ता रसत्यावरचा लढा लढावाच लागेल. आता जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय़ होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असा एल्गार राजन विचारे यांनी यावेळी केला.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |