सातारा : भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया व वित्तीय समावेशन भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 3 महिन्यापासून सुरू असलेल्या रि-केवायसी व जनसुरक्षा मेळावे अंतर्गत सर्व ग्रामपंचायत पातळीवर सर्व खातेदारांची रिकेवायसी करून विविध सुरक्षा योजनांचा फायदा देण्याचे काम सुरू आहे. सदर मोहिमेस 1 महिन्याचा वाढीव कालावधी देऊन शिल्लक राहिलेल्या सर्व लोकांचा जनसुरक्षा योजनेअंतर्गत समावेश तसेच बंद पडलेल्या खात्यांमध्ये रि-केवायसी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. अनेक खाती व्यवहाराअभावी निष्क्रिय झाली आहेत सदर खात्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड व आवश्यक केवायसी कागदपत्रे देऊन ग्राहक ही खाती पुनर्जीवित करून चालू करून घेऊ शकतात. सर्व बँकांच्या माध्यमातून ऑक्टोबर 31 अखेरपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.
अनेक मयत लोकांच्या खात्यामध्ये वारस नोंदणी नसल्यामुळे अनेक लोकांचे पैसे बँकांमध्ये अडकून पडतात तरी सर्वांनी री-केवायसी बरोबर आपली वारस नोंदही करून घ्यावी. रिझर्व्ह बँकेने (RBI) निष्क्रिय खाती पुन्हा सुरू करण्यासाठी आणि न मागितलेल्या ठेवी हाताळण्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहे आता ग्राहक आपले KYC अपडेट व्हिडिओ कॉलद्वारे, Whatapp बँकींग, बँक मोबाइल अँप, इंटरनेट बँकींग तसेच बँक शाखेतून किंवा व्यवसाय प्रतिनिधी (BC) कडे जाऊन करू शकतात.