सातारा : युवकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास शेंद्रे सातारा सर्विस रोडवर प्रणव उमेश गायकवाड रा. विकास नगर, खेड, ता. सातारा या युवकाला कोयता व लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी प्रमोद पोतेकर, दिग्विजय चिंचकर, प्रणव बर्गे, विकास गुजर, रोहन पडवळ, सोन्या उर्फ विवेक अनिल पोतेकर, सिद्धार्थ पोतेकर, प्रतीक उर्फ बंड्या पडवळ सर्व रा. शेंद्रे, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे करीत आहेत.
युवकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा